21st Update
गोष्टी साध्या आणि सरळ विचार करावयास भाग पाडणाऱ्या .....
खरं तर प्रयत्नच आपल्याला संकटातून बाहेर काढतात. ते न करता आपण नशिबाला दोष देतो.
तेव्हा या दोन गोष्टी लक्षात असूद्यात :-
१. प्रयत्न करने कधी सोडू नका, कासवाच्या गतीने का होईना पुढे चालत राहा.
२. आणखी एक आपल्याजवळ जे काही इतरांना मदतीच्या स्वरूपात देण्यासारखे आहे ते देत राहा, कारण ज्ञान दिल्याने वाढते आणि मदत केल्याने आशीर्वाद मिळतात.
गोष्टी साध्या आणि सरळ विचार करावयास भाग पाडणाऱ्या .....
१. धीरूभाई अंम्बानी यांचा ड्रायव्हर सोबतचा एका प्रवासातील प्रसंग गोष्टीच्या स्वरूपात :-
नक्की वाचा तुम्हाला आवडेल...
एकदा धीरूभाई अंबानी एका अर्जंट मीटिंगसाठी त्यांच्या ड्रायव्हर सोबत जात होते, वाटेत सुसाट्याचा वारा आणि पाउस आला.
ड्रायव्हर ने अंम्बानीनां विचारले, 'सर आता काय करू...?'
त्याला अंम्बानींनी उत्तर दिले :- तू गाडी चालवत राहा.
पावसा मध्ये गाडी चालविणे मुश्कील होत होते.
परत ड्रायव्हर ने पुढे काही अंतर अंम्बानीनां विचारले, 'सर आता काय करू...?' त्याला अंम्बानींनी पुन्हा म्हणाले तू गाडी चालवत राहा.
थोडे पुढे गेल्यावर ड्रायव्हर ने पहिले की वाटेत पावसामुळे अनेक वाहने थांबली होती. यावर ड्रायव्हर अंम्बानीनां म्हणाला, सर मला आत्ता गाडी थांबवायला हवी' पुढचे दिसताना खुप अवघड जाते. सर्व लोक गाड्या बाजूला घेवून थांबलेत. काय करू सांगा सर...
त्याला अंम्बानींनी पुन्हा सांगितले 'तू थांबु नको तुला हळू हळू जमेल तशी गाडी तू चालवत राहा.'
पावसाने रौद्र रूप धारण केले होते. परंतु ड्रायव्हर आत्ता एकाही प्रश्न साहेबांना न विचारता गाडी चालुच ठेवली आणि असेच हळू हळू गाडीने पुढे जायला लागल्यावर ड्रायव्हरला समोरचे साफ दिसायला लागले आणि पुढे काही अंतरावर गेल्यावर तर चक्क पाऊस गेला होता अक्षरशः पाउस नव्हताच आकाश मोकळे होते आणि ऊन पडले होते.
धीरूभाई अंम्बानी ड्रायव्हर ला तेथे जरा आणखी पुढे आल्यावर स्वतःहून म्हणाले, तू आत्ता गाडी थांबवु शकतोस.'
ड्रायव्हर म्हणाला आत्ता कशाला गाडी थांबवायची साहेब ..?
धीरूभाई म्हणाले थांबव तर खरे.
यावर ड्रायव्हर ने गाडी थांबवली, आणि ड्रायव्हर ने गाडी थांबवल्यावर ते स्वतः गाडीतुन खाली उतरले आणि ड्रायव्हर ला बाहेर बोलवुन मागे वळून पाहायला सांगितले, यावर ते ड्रायव्हर ला म्हणाले इथे तर चक्क ऊन पडले आहे, वाटेत थांबलेले लोक अजूनही तिथेच फसलेले आहेत आणि तू प्रयत्न न सोडता हळू हळू गाडी चालवत राहिलास आणि बघ आत्ता आपण त्या धोक्यातून पूर्ण पाने बाहेर पडलो. तू धीर खच्चून अजून तिथेच थांबला असतास तर अजून खुप वेळ आपल्याला तिथेच थांबावे लागले असते.
तात्पर्य :-
हा किस्सा त्यांच्या साठी आहे जे आत्ता वाईट परीस्तीथीतून जात आहेत. कठीण काळी खुप माणसे प्रयत्न सोडून हार मानतात. त्यामुळे अडचणीतून त्यांना लवकर बाहेर पडता येत नाही.
खरं तर प्रयत्नच आपल्याला संकटातून बाहेर काढतात. ते न करता आपण नशिबाला दोष देतो.
जीवनातील एक सत्य :-
२. या संसारात दोन प्रकारचे वृक्ष आहेत ....
प्रथम :- आपल फळ स्वतःहून देणारे - उदाहरण :- आंबा, पेरू, केळी इत्यादी ...
द्वितीय :- आपलं फळ लपवुन ठेवणाऱ्या - उदाहरण :- बटाटा, आलं आणि कांदा इत्यादी ...
जे वृक्ष आपली फळ स्वतःहून देतात त्या वृक्षांना सर्वजण खत पाणी देऊन सुरक्षित ठेवतात.
परंतु
जे आपलं फळ लपवुन ठेवतात त्यांना मुळा सहित उपटुन टाकल जातं...
तात्पर्य :-
अगदी याच प्रमाणे जो मनुष्य आपली विद्या ज्ञान, धन, शक्ती स्वतःहून समाजाच्या सेवेसाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी खर्च करतो. तो समाजात मान सन्मान मिळवण्यास प्राप्त ठरतो. त्याची चांगली कीर्ती समाजात शिल्लक राहते.
याउलट जो जो मनुष्य आपली विद्या ज्ञान, धन, शक्ती स्वार्थापोटी लपवुन ठेवतो. दुसऱ्यांना देण्याची वृती बाळगत नाही तो त्या वृक्षांप्रमाणे समाजात स्थिर राहत नाही. उपटला जातो.
तेव्हा या दोन गोष्टी लक्षात असूद्यात :-
१. प्रयत्न करने कधी सोडू नका, कासवाच्या गतीने का होईना पुढे चालत राहा.
२. आणखी एक आपल्याजवळ जे काही इतरांना मदतीच्या स्वरूपात देण्यासारखे आहे ते देत राहा, कारण ज्ञान दिल्याने वाढते आणि मदत केल्याने आशीर्वाद मिळतात.
No comments:
Post a Comment