Sunday 2 December 2018

BE THE CEO OF YOUR OWN LIFE

दिनांक :- ०२-१२-२०१८

अप्रतिम लेख नक्की वाचा आणि वाचल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही बदल करावासा वाटला तर नक्कीच करा..

मी तर म्हणतो बघा वाचून एकदा हा लेख नक्कीच फरक पडेल तुमच्या आयुष्यात कदाचित हा लेख तुमच्या ही वाचनात याआधी आला असेलही तरीपण पुन्हा एकदा माज्या वाचनात आलेला हा लेख तुम्हा सर्वांसाठी :-


                                              !!! BE THE CEO OF YOUR OWN LIFE !!!




दोन दिवसापुर्वीची गोष्ट कुटुंबासह कुठल्यातरी मॉल मध्ये होतो. मुलगा 'प्ले झोन' मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसीची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो. पेपर खर तर नावाला. माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची, आकारांची माणसं जणू 'आज' जगाचा शेवटचा दिवस असावा' असे भाव आणुन शॉपिंग करत होती. (एवढ्या वस्तु विकत घेऊन त्या वस्तु माणसं घरात कुठे ठेवतात, हा मध्यम वर्गीय प्रश्न मला कायम सतावतो. असो.)


माझं 'माणसं-वाचन' चालु असतानाच माज्या शेजारी एक तरुण येऊन बसला. जेमतेम चाळीसीचा असावा. जीन्स आणि खोचलेला टी-शर्ट, पायात बुट, अंगावर बुट, हातात मराठी पुस्तक, खिशातला शुभ्र रुमाल काढुन त्याने कपाळावरचा घाम पुसला. रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि त्याचं खिशात ठेवली. त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले. ते पुस्तक माज्या आवडत्यांपैकी एक होतं. न राहवून मी म्हंटल, मस्त पुस्तक आहे.' त्याने माज्याकडे बघुन हसत मान हलवली.

पाच एक मिनिटांनी तो माज्याकडे वळुन म्हणाला, 'वाचन आवडतं..?'
'प्रचंड. रीडिंग इज माय फर्स्ट लव्ह,' आजूबाजूला 'सौ' नाही हे बघत मी म्हटलं.

'किती वाजता रोज...?'

'रोज असं नाही... अं...काही खास असं ठरवलेलं नाही. इच्छा झाली कि वाचतो.' अनपेक्षित योर्करला कसं बसं खेळत मी म्हटल.

खायला आवडतं? कॉनजीक्यूटिव्ह यॉर्कर.
प्रचंड इटिंग इज माय सेकंड लव्ह.'

हो.' मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा...??
'नाही नाही... रोज दोन वेळा.. आणि मध्ये मध्ये काही ना काही खादाडी चालु असतेच.' हिट विकेट !

तो तरुण हसला आणि म्हणाला मी दिवस भरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. अंघोळ जेवण तसच वाचन...!!



'बरा वेळ मिळतो तुम्हाला.' दयनीय चेहरा करत मी म्हटलं.

त्यावर तो तरुण म्हणाला:
वेळ मिळत नाही, मी काढतो. तसाही 'वेळ' ही जगातली सगळ्यात टेकन फॉर ग्रांटेड गोष्ट आहे असं मी मानतो. फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना ! फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला ! 'मी' रिटायर झाल्यावर भरपुर वाचन करणारे' असं कोणी म्हंटल ना, की माझी खात्री आहे की, नवज्योत सिंग सिद्धुसारखा रेड्यावर हात आपटत तो 'यम हसत असेल' !

मी हसलो तसं किंचित गंभीर होत त्याने विचारल, 'तुम्ही कधी पाहिलंय यमाला..?'

मी आणखी हसु लागलो.
'आय एम प्रीटी सिरीयस. तुम्ही पाहिलंय यमाला..?
मी म्हणालो हो, दोन वर्षापुर्वी. रस्ता क्रॉस करत होतो. समोरून भरगाव गाडी आली, त्या दिव्यांच्या प्रकाश झोतातही मी अंधार पहिला. त्या दोन सेकंदात मला मृत्यूने दर्शन दिलं. त्या नंतर जागा झालो ते हॉस्पिटल मध्येच. गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो. हॉस्पिटल मधुन घरी आलो ते नवा जन्म घेऊन. 'मी' देव पहिला नव्हता पण 'मृत्यू' पहिला होता. मृत्यू तुम्हाला खुप शिकवतो.

माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनही 'मी' अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणुस ! तुम्हाला माहितीय, माणुस मृत्यूला का घाबरतो..?

'अर्थात' ! मृत्युनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात. मृत्युमुळे माणसाच्या इच्छा अपुर्ण राहतात.'

मी म्हटलं. साफ चूक, माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्युनंतर 'उद्या' नसतो !'
'मी समजलो नाही.'

'प्रत्येक काम आपल्याला उद्यावर टाकायची सवय असते. वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे.. गंमत म्हणजे आहेत ते पैसे सुद्धा आपण आज उपभोगत नाही. ते कुठेतरी गुंतवतो. भविष्यात 'डबल' होऊन येतील म्हणुन !
या उद्या वर आपला फारसा भरवसा नसतो. पण तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो. आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू आपल्याला उद्या बघायची संधी देत नाही. !मृत्यू म्हणजे- आहोत तिथे, आहोत त्या क्षणी फुल  स्टॉप ! म्हणजे खेळ ऐन रंगात आलेला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढाव, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो. तुमच्यावरील या 'अन्यायाविरुद्ध' आवाज उठवायला सुद्धा तुम्ही उरत नाही. माज्या मृत्यू नंतर मी माजा 'लाडका' उद्या पाहु शकणार नाही, या हतबलतेला मनुष्य जास्त घाबरतो. म्हणुन मी हॉस्पिटल मधुन घरी आल्यावर ठरवलं. या पुढंच आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं. इतके दिवस जेवण नुसतेच 'गिळल'. यापुढे एकेका घासाची मजा  घ्यायची. आयुष्याची माजा घेत जगायचं.'

'म्हणजे तुम्ही नक्की काय केलं ..? माझी उस्तुकता आता वाढली होती. 
'माज्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली. मी माज्या आयुष्याचा CHIEF EXECUTIVE OFFICER झालो !'

कंपनीचा सी. ई. ओ. वैगरे इतपर्यंत ठीक आहे. आयुष्याचा 'सी. ई. ओ. वैगरे.. जरा जास्तच होत नाही का..? मी विचारलं.

'वेल... तुम्हाला काय वाटतं हे माज्यासाठी महत्वाच नाही. आयुष्य कसं जगायचं याचे नियम मी माज्यापुरते केलेत. त्यामुळे..'

'मग तुमच्या कंपनीत किती माणसं आहेत..? त्याला मध्येच तोडत, मस्करीच्या सुरात मी विचारलं, म्हटलं तर खुप, म्हंटल तर कोणीच नाही.' तो खांदे उडवत म्हणाला.

मला न कळल्याच पाहुन तो पुढे बोलु लागला. 'मी फक्त माज्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सोबत दिल करतो. दे व्हर्चुअली कंट्रोल माय लाईफ. 
माज्या बोर्डवर विविध माणसे आहेत. फरहान अख्तर, शिवाजी महाराज, अब्दुल कलाम, चार्ली चॅप्लीन, गांधीजी, अमिताभ, हेलन केलर, जे आर डी टाटा....'



माज्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भान न्याहाळत त्याने आणखी काही नावे घेतली.   

या लोकांबद्दल वाचलं तेव्हा एक लक्षात आलं. या प्रत्येकामध्ये काहीना काही वैशिष्ट्य आहे. काही क्वालिटीजमुळे मला ही माणसं ग्रेट वाटतात. मी काय करतो…अं…उदाहरण देतो…समजा खोटं बोलण्यावाचून पर्याय नाही अशा परिस्थितीत सापडलो की माझे ‘एथिक्स डायरेक्टर’ गांधीजींना विचारतो, काय करू? मग ते सांगतील ते करतो. व्यायाम करायला जाताना सकाळी उठायचा कंटाळा आला तर माझे ‘हेल्थ डायरेक्टर’ फरहान अख्तर मला काय म्हणतील, या विचाराने मी उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो. कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं. मग माझ्या ‘इन्स्पीरेशन डायरेक्टर’ हेलन केलरना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या अडचणी फारच मामुली वाटू लागतात. कधी दुःखी झालो तर ‘इंटरटेनमेंट डायरेक्टर’ चार्ली चॅप्लीन भेटायला येतात…’


माझ्या चेहऱ्यावरील विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला..’मला माहितीय की ऐकायला हे सगळं विचित्र वाटत असेल. पण एक गोष्ट सांगतो. आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल, तर प्रत्येक माणसाने स्वतःचा ‘सीलॅबस’ बनवावा हे उत्तम ! आपण अनेकदा ‘इतरांप्रमाणे’ आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो. जगायचं कसं? या प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहेत. 
हजारो वर्षे माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. गौतम बुद्धांनी मात्र फक्त चार शब्दांत उत्तर दिलं -Be your own light. मला तर वाटतं, याहून सोपं आणि याहून कठीण स्टेटमेंट जगात दुसरं नसेल !’
मी त्या तरुणाला नाव विचारलं. त्याने सांगितलं. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
चार पावलं चालून गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला. म्हणाला, ‘सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं.
मी एका अॅक्सिडेंटमध्ये वाचलो आणि इतकं काही शिकलो. तुम्ही…प्लीज..कुठल्या अॅक्सिडेंटची वाट पाहू नका !’ आम्ही दोघेही हसलो.
अपघात फक्त वाहनांमुळेच होतात, असं थोडीच आहे? ओळखपाळख नसलेला तो तरुणही अपघातानेच भेटला की !


घरी जायला आम्ही रिक्षात बसलो. ‘प्ले झोन’मध्ये खेळून पोरगं आधीच दमलं होतं. वाऱ्याची झुळूक रिक्षात येऊ लागली. मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपून गेला होता. त्याच्या मऊ मऊ केसांमधून हात फिरवताना संध्याकाळच्या गप्पा आठवत होत्या.
मनात आलं, ‘आपल्या पोराने जर असे ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स’ नेमले, तर त्यात ‘त्याचा बाप’ असेल का?’
परवाच्या रात्री बराच वेळ जागा राहिलो.
कोण जाणे, कदाचित हाच प्रश्न यापुढील आयुष्य ‘चवीने’ जगत राहायची उर्जा देत राहील !

प्रत्येकाने वाचावा असा नविन काळेंचा अप्रतिम लेख.



Sunday 22 July 2018

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण

दिनांक :- २२.०७.२०१८


                                                      "मन करा रे प्रसन्न"
                                   (व्यक्तिमत्व विकासाचे सोपे मार्ग या पुस्तकातून)





"एकदा एक विद्वानाने आपल्या विद्यार्थ्यांना सांगितले की, जो कोणी सर्वश्रेष्ठ सुविचार सांगेल त्याला पाचशे रुपयांचे बक्षीस दिले जाईल. अनेकांनी आप- आपले विचार प्रस्तुत केले. पण बक्षीस कोणाला मिळाले माहित आहे ? 

पुढील विचारला

"मन प्रसन्न हवे, मग झोपडी काय नि राजवाडा काय सारेच सारखे."




मनाची प्रसन्नता हे एक अनमोल धन आहे. प्रसन्नता म्हणजे समाधान आणि समाधान हीच आपली    सर्वश्रेष्ठ  संपत्ती. डेल कार्नेजी यांनी आपल्या एका पुस्तकात म्हंटले आहे की प्रसन्नताच एक अशी वस्तु आहे की जी स्वत:ची हानी न होता दुसऱ्याला दिली जाऊ शकते.

तत्वज्ञ साधु वासवानी तर म्हणतात. "तुम्हाला जर प्रसन्न राहायचे असेल तर इतरांना प्रसन्न करा."

प्रसन्नतेमुळे आपली सर्वांशी मैत्री होते. स्वामी विवेकानंदानी अमेरिकेत अनेक लोक लोहचुंबकाप्रमाणे आपल्याकडे आकर्षित करून घेतले. याचे कारण त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता. दुसऱ्याच्या हृदयात शिरायला प्रसन्नतेसारखे दुसरे धन नाही.

शरीर स्वस्थ व आरोग्यसंपन्न ठेवायला  प्रसन्नतेसारखे औषध नाही. मोठे लोक संकटाचेही स्वागत प्रसन्नतेनेच करतात. संकटाचेही जो प्रसन्नतेने स्वागत करतो त्याच्या संकटाची तीव्रता कमी होते. कुंती ने ही श्री. कृष्णा जवळ संकट दे अशीच मागणी केली. पण संकटे सहन करण्याची शक्तीही मागितली. 




प्रसन्नता ही यशाची गुरुकिल्ली आहे. ध्येयसिद्धीसाठी प्रसन्नता हे प्रत्येकाजवळ असणारे धन आहे. 

प्रसन्नता कशाने प्राप्त होते...?????

उदारता, श्रद्धा, कर्तव्य परायणता, आशावाद, निरपेक्ष वृती, संयम व विनम्रता यांच्याजोगे जीवनात प्रसन्नता येऊ शकते. म्हणुनच तुकाराम महाराजांनी म्हंटले आहे:



                                                 "!!!! मन करा रे प्रसन्न !!!!"
                                               "!!!! सर्व सिद्धीचे कारण !!!!"

श्री. आचार्य विनोबा म्हणतात, ज्या ठिकाणी नम्रता नाही, त्या ठिकाणी प्रसन्नता नाही. प्रसन्नता नसेल तर बुद्धीची स्थिरता किंवा मनाची एकाग्रता होत नाही. तेव्हा प्रसन्नता ही एक प्रकारची संजीवनी आहे.


                                          !!!! प्रसन्नतेपुढे सर्व दु:खे जाती झडोनिया  !!!!
                                          !!!! प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे !!!!
                                                                                                          गीताई....

प्रसन्नता एक हास्य- चिकित्सा आहे. हिब्रु भाषेत एक उक्ती आहे की, प्रसन्नता हे कायाकल्प करणारे औषध आहे. एक अनुभवी व वृद्ध गृहस्थाने एका तरुणास आनंदप्राप्तीसाठी लागणाऱ्या दहा गोष्टी लिहावयास सांगितल्या. त्याने यश, कीर्ती, सन्मान अशा अनेक गोष्टी लिहिल्या, त्या अनुभवी गृहस्थाने ती यादी खोडून एकच गोष्ट लिहिली ती म्हणजे "मनाची प्रसन्नता".




फुलाला काटे असतात म्हणुन ओरडण्यापेक्षा काट्याबरोबर फुले ही असतात म्हणुन धन्यता मानली पाहिजे.

आशावादी माणसाला अडचण ही पण संधी वाटते तर निराशावादी माणसाला संधी ही सुद्धा अडचण वाटायला लागते. म्हणुनच आशावाद व विश्वास ही प्रसन्नतेची दोन चाके आहेत. नकारात्मक विचारांचा प्रभाव देखील नकारात्मक असतो. असे विचार मनाच्या शक्तीला दुर्बल करतात व कार्यक्षमतेला बाधक ठरतात. म्हणुनच आपण जे कार्य करतो ते प्रसन्नातापुर्वक केले पाहिजे.

"उन्नतीचा मार्ग म्हणजे परिश्रम व जे परिश्रम करतात आणि कार्य हेच सौंदर्य मानतात तेच महान होतात." ते स्वतः आनंदी असतात व जेथे असतील तेथे आनंद निर्माण करतात." ज्यांच्यामध्ये प्रसन्नता नसते ते दुसऱ्याचा द्वेष करतात. दुसऱ्याची उन्नती त्यांना सहन होत नाही. तेव्हा प्रसन्नता हा सद्गुण असुन सर्वांनी तो अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


प्रसन्न ते बाबत मार्टिन ल्युथर ची एक गोष्ट आहे. 



एकदा तो भयंकर निराश झाला होता. निराश्याच्या पोटी त्याच्या घरचे वातावरण पण उदास झाले होते. त्याच्या पत्नीने त्याला खुप धीर देण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ ! शेवटी तिला एक युक्ती सुचली ती एके दिवशी काळे कपडे घालुन शोक करू लागली.

हे मार्टिन ने पहिले आणि त्याने त्याच्या पत्नीला विचारले की कोण मरण पावले ...???
यावर त्याची पत्नी म्हणाली: "तुम्हाला माहित नाही का..? की आज सकाळी ईश्वराचे निधन झाले."

मुर्खासारखे, वेड्यासारखे काहीही बरळू नकोस ईश्वर कधी मारतो का...?? तो अमर आहे. मार्टिन म्हणाला.

पत्नी म्हणाली: आपण म्हणाले ते नाकी खरे आहे का..???
मार्टिन : तुला नाकी संशय येतो तरी कसा..??? "मी सांगतो ते अगदी सत्य आहे."
पत्नी: मग जर असे आहे तर तुमचा चेहरा असा कसा...? अशी तुमची कोणती काळजी आहे जी ईश्वरही दूर करू शकणार नाही..? कोंडी फुटली आणि ल्युथर मनापासुन हसला पत्नीचे म्हणणे त्याला एकदम पटले.   


"प्रसन्नता ही जीवनाची सवय बनवा म्हणजे मग निराशेच्या ढगातूनही तुम्हाला आशेचे किरण दिसू लागतील." 

तेव्हा याचा शेवट मी असा करेन:



"प्रसन्नता आपण जितकी मिळवण्याचा प्रयत्न करू तितकी ती मिळत जाते. याचे कारण प्रसन्नता ही बाहेर शोधायची वस्तु नाही. भौतिक सुखांवर ती अवलंबून आहे. त्यामुळे मन उदास असेल तर सर्व उदास वाटायला लागेल आणि मन प्रसंन्न असेल तर सर्व प्रसंन्न वाटायला लागेल. आणि हो जी गोष्ट करण्याने तुम्हाला आनंद मिळत असेल ती गोष्ट आपण जरूर करायला हवी तिला कोणाच्याही सांगण्यावरून मध्ये अध्ये थांबवु नये. शेवटी मनाचा आनंद महत्वाचा कारण मन प्रसन्न तर सार काही प्रसन्न.    

Saturday 21 April 2018

थेंबे थेंबे तळे साचे सुखाचा मुलमंत्र वाचाच एकदा ...

दिनांक :- २१.०४.२०१८

थेंबे थेंबे तळे साचे सुखाचा मुलमंत्र वाचाच एकदा ...
काही छोट्या छोट्या गोष्टींच्या स्वरूपात:-



कथा नंबर एक:-

"सुप्रसिद्ध कारखानदार हेन्री फोर्ड" यांच्या घरातील भिंतीवर एक फोटो होता, त्यात ते एका गरीब व्यक्तीला आलिंगन देत आहेत असे दृश्य होते. बरेच दिवस हा फोटो त्यांच्या घरात पाहिल्यानंतर एक दिवस त्यांच्या चिटणीसाने त्यांना सर ही फोटोतील व्यक्ती कोण आहे ? असे विचारले.

त्यावर हेन्री फोर्ड म्हणाले हा माजा वर्गमित्र आहे. 

यावर आश्चर्य चकित होऊन चिटणीसाने पुन्हा विचारले... मग सर दोघांमध्ये एवढा फरक कसा..??

त्यावर हेन्री फोर्ड म्हणाले "आम्ही दोघांनी कमाईस एकत्रच सुरुवात केली. त्याने मात्र कमाई पेक्षा जास्त खर्च करायला सुरुवात केली. तर मी त्याच दिवसापासून "थोडी-थोडी बचत करायला सुरुवात केली." 

आज साध्या असेच एक उदाहरण आपल्याला आपल्या भारत देशात पाहायला मिळते. भारताचा लिटील मास्टर सचिन तेंदुलकर आणि एक उत्कृष्ट क्रिकेट पटू न बनू शकलेला त्याचाच एक वर्गमित्र विनोद कांबळी. दोघेही एकाच शाळेतील, एकाच वर्गातील दोघांचीही क्रिकेट उत्तम, मग असे काय झाले की विनोद कांबळी हा क्रिकेट पासुन दूर गेला....

एक वेळ तर अशी होती की त्याच्याकडे घर असुन सुद्धा घराचा मेंटेनन्स भरायला पैसे नव्हते आणि याउलट सचिन हा उत्तम क्रिकेट खेळतच गेला श्रीमंत तर झालाच पण प्रामाणिक पणा आणि नम्रपणाने त्याने सर्वांना आपलेसे केले. काहीजण तर असेही म्हणतात की विनोद कांबळी हा सचिन पेक्षा उत्तम क्रिकेट खेळायचा, विनोदही भारता साठी क्रिकेट खेळला पण प्रचंड ग्ल्यामर, पैसा पटकन आलेली श्रीमंती याने तो भुलला त्याला ते टिकवता आले नाही. अय्याशी, एशाराम अश्याने क्रिकेट पासुन तो दूर गेला आणि दोन मित्रांमध्ये खुप अंतर निर्माण झाले.

सचिन ने त्याला मदत केलेही पण त्याचीही त्याने जाणीव नाही ठेवली. असो हा एक भाग...  पण आज सचिन क्रिकेट विश्वातून निवृत्त होऊनही सर्वांच्या मना मना मध्ये बसलेला आहे आणि तो शेवट पर्यंत तसाच राहील.  

कथा नंबर दोन :- 

अमेरिकेतील एक धनाढ्य श्री. रॉकफेलर हे एका हॉटेलमध्ये स्वस्त खोल्यांची चौकशी करत होते, 
तेव्हा हॉटेल चा मालक त्यांना म्हणाला, "आपल्या कंपनीमधील कारकुन सुद्धा आमच्या हॉटेलमध्ये महागड्या खोल्या घेऊन राहतात" यावर श्री. रॉकफेलर यांनी हॉटेल मालकाला म्हणुनच ते गरीब राहिले आहेत असे तत्काळ उत्तर दिले. 

यशस्वी उद्योजक कार्नेजी म्हणतात "सुखाचा व समृद्धीचा मुलमंत्र म्हणजे बचतीची सवय, पैसा, यश व स्वातंत्र्य या तिन्ही गोष्टी मिळवणे एकवेळ सोपे असते."

"थेंबे थेंबे तळे साचे...बचत से बरकत"... याचा विसर पडता कामा नये. 

समजा एखाद्या देशाची संख्या ८० कोटी आहे, त्या देशातील प्रत्येक नागरिकाने प्रत्येक दिवशी केवळ एक पैसा बचत करण्याचे ठरवले तरी महिन्याभरात ही रक्कम २४ कोटी तर वर्षा भरात ही रक्कम २८८ कोटी रुपये इतकी होईल. त्या देशाचा आर्थिक कायाकल्प घडून येईल.  

कथा नंबर तीन :-

"विश्वविख्यात कुबेर श्री. रॉकफेलर एकदा आपल्या तेल कारखान्यातून हिंडत होते. असेच फिरत असताना एका यंत्राजवळ ते थांबले. हे यंत्र तेलाच्या पिंपाची झाकणे सील करण्याचे काम करत होते. त्यासाठी यंत्रातुन प्रत्येक झाकणासाठी ४० थेंब रसायन वापरले जात होते, त्यांना ते थोडेशे जास्त वाटले, म्हणुन त्यांनी फोरमन ला बोलवले व झाकण बंद करण्यासाठी किती थेंबाची आवश्यकता आहे ते विचारले, त्याला नीट सांगता आले नाही. तेव्हा श्री रॉकफेलर यांनी स्वतः अभ्यास करून ३९ थेंबात हे काम होऊ शकेल असा निष्कर्ष काढला. त्याप्रमाणे त्यांनी ३९ थेंबच वापरण्याचे आदेश दिले. या एका थेंबाच्या बचतीतुन कारखान्याचे प्रतीवर्षी ८ लाख डॉलर्स वाचु लागले.   

कथा नंबर चार:-

"बाबा कैलाशनाथ एक सत्व पुरुष होते, आपल्या गावात एक देऊळ बांधावे असे त्यांना वाटले, गावातील प्रत्येक माणसांकडून त्यांनी १-१ पैसा मदत म्हणुन गोळा केला, आणि आज ते देवालय १ पैसा देवालय म्हणुन प्रसिद्ध आहे. याच पद्धतीने त्यांनी २ पैसा विद्यालय बांधून काढले," अशी आहे बचतीची किमया...

कोणी एका लेखकाने असे म्हंटले आहे की, 

"आकाशातील सर्वात उंच जागेवर बचत बँक हे शब्द फक्त 'दोन शब्द' सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावेत. अल्पबचत म्हणजे केवळ धनसंचय नव्हे, तर फालतू आणि वाईट सवयींवरील खर्च यांना रजा देणे होय." 



कथा नंबर पाच:- 

" एकदा पंडीत मदनमोहन मालवीय बनारस विद्यापीठासाठी देणगी मागण्यासाठी म्हणुन एका श्रीमंत शेटजींकडे गेले. त्याचवेळी ते शेटजी आपल्या धाकट्या मुलाला काडीपेटीतील काड्या वाया घालवण्या वरून रागावत होते.

यावर हा चिक्कु गृहस्थ आपल्याला काय मदत देणार..? असा विचार पंडीत मालवीय यांच्या मनात येऊन गेला. 

थोड्यावेळाने शेटजींने पंडीत मालवीय यांना काय काम आहे असे विचारले, तेव्हा भीत भीत मालवीय म्हणाले "बनारस विद्यापीठासाठी (त्याच्या स्थापनेसाठी) काही देणगी आपणाकडून घ्यावी म्हणुन आलो होतो. परंतु परत केव्हा तरी येतो असे म्हणुन पंडीत निघायला लागले, यावर शेटजींनी त्यांना थांबवले व आपल्या मुलास चेकबुक आणायला सांगितले.

चेकबुक आणल्यानंतर त्यांनी आपल्या खात्यातुन "पाच हजार" रुपयांचा धनादेश पंडीत मालवीय यांच्या हातात दिला. 

त्यांची ती उदार देणगी पाहुन पंडीत मालवीय यांना राहवले नाही व त्यांनी शेटजींनी विचारले की आत्ताच तुम्ही आपल्या मुलाला काडीपेटीतील काड्या वाया घालवण्यावरून ओरडत होतात. चेक देण्याची आपली ही वृत्ती पूर्वीच्या वृत्तीशी विसंगत नाही का वाटत...? त्यावर शेटजी हसत हसत उदगारले, 

"काटकसर म्हणजे चिक्कु पणा नव्हे, तर योग्य कारणासाठी योग्य ठिकाणी योग्य पैसा खर्च करणे होय."

पंडीत मालवीय त्यांच्याकडे बघतच राहिले त्या दिवशी ते आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकले. की...

"शुल्लक गोष्टीतुन जे पुर्णत्व प्राप्त होते ते कधीच पुर्ण नसते." पैशांचे रक्षण आपण केले तो आपले रक्षण करतो."

                                                  !! "अर्थो रक्षति रक्षित:" !!                    

ब्रेन्जामीन फ्रॅक्लीन म्हणतात, "आपण आपल्या उत्प्नाना पेक्षा कमी खर्च करत असाल तर खुशाल असे समजा की आपल्याजवळ पारसमणी आहे." तारुण्यात बहुतेक लोक चैन, एषाराम व उधळपट्टी करतात. बचत, काटकसर या शब्दांची टवाळी करतात, याउलट विचारी आणि सयंमी माणसाचे वर्णन कसे असते ते पहा.

      
कथा नंबर सहा :-

"एका माणसाला सोन्याचे घड्याळ विकत घेण्याची इच्छा होती. तो आपल्या दुपारच्या जेवणावर ५० सेंट खर्च करीत असे. त्याने २५ सेंट खर्च करण्याचा संकल्प केला. ६ महिन्यात त्याच्याकडे घड्याळ खरेदी करण्याइतपत रक्कम जमा झाली, तेव्हा मित्राने त्याला विचारले  की अरे पैसे तर जमा केलेस मग तू अजुन तू घड्याळ का खरेदी केले नाहीस..?

यावर तो म्हणाला आत्ता माज्या मनात एक वेगळाच विचार चालु आहे. जर मी ५० सेंट एवजी २५ सेंट मध्येच माजा भोजनाचा प्रबंध करू शकतो तर सोन्याचे घड्याळ न घेताही माझे काम चालु शकते. त्यामुळे मी ही केलेली बचत माज्या भविष्यकालीन ऐश्वर्याची आधारशीला ठरणार आहे. मी आत्ता या बचतीतून सुंदर वास्तु बांधणार आहे."

कथा नंबर सात:-

ब्रेन्जामीन फ्रॅक्लीनच्या दुकानासमोर एक मनुष्य बराच  वेळ फालतु चौकशी करत हिंडत होता, शेवटी त्याने विचारले की या पुस्तकाची किमंत काय..?? विक्रेता म्हणाला आहे, १ डॉलर, "पण तुम्हाला पडतील २ डॉलर, " त्यावर तो म्हणाला तुज्या मालकांना बोलव मी त्यांची भेट घेऊ इच्छितो." 

यावर श्री. फ्रॅक्लीन आपले काम सोडून आले. ग्राहकाने त्यांनाही विचारले की आपण हे पुस्तक कमीत कमी केवढ्याला द्याल..?"

  
ब्रेन्जामीन फ्रॅक्लीन म्हणाले ३ डॉलर, 

मनुष्य म्हणाला "पण आत्ताच आपल्या नोकराने किमंत दोन डॉलर सांगितली." 

बरोबर आहे आपण त्याचा जो वेळ घेतला त्याचा त्याने १ डॉलर ज्यादा सांगितला आणि माज्या वेळेबद्दल १ डॉलर. तो तरुण काय समजायचा ते समजला...


 शेवटची गोष्ट :-                                   

"एकदा एक राजा बुद्धिबळ खेळत होता. एक शेतकरी त्याच्याकडे मदत मागायला आला. राजा म्हणाला बोल किती पैसे देऊ ..? त्यावर तो चतुर शेतकरी म्हणाला "बुद्धिबळाच्या पहिल्या घरावर एक रुपया, दुसऱ्या घरावर त्याच्या दुप्पट, तिसऱ्या घरावर दुसऱ्याच्या दुप्पट अशा प्रकारे ६४ व्या घरावर पैसे ठेवा व मला द्या." राजाला वाटले काय किरकोळ मागणी आहे," परंतु यावर राजाने अंमल केले असता त्याचा संपुर्ण खजिना रिकामा झाला तरी तो शेतकऱ्याची मागणी पुर्ण करू शकला नाही."

विचार करा आणि लक्षात ठेवा. 


                                        "वेळ किवां पैसा विनाकारण खर्च करणे 
                                       म्हणजे दिलेले जीवन व्यर्थ घालवणे होय."

"जीवनामध्ये सुख व समृद्धीच्या मार्गावरून तुम्हाला चालायचे असेल तर थेंबे थेंबे तळे साचे... हा सुखाचा मुलमंत्र लक्षात ठेवा.


छोट्या छोट्या गोष्टींनीच मोठी मोठी कार्ये पार पडतात, तेव्हा लक्षात ठेवा परमाणु पासुनच परमाणु बॉम्ब बनतो. 

Sunday 25 February 2018

तुम्हाला सर्वाधिक महत्वाचं वाटणारं नातं...... या बद्दल थोडेसे

22nd Update

Date :- 25.02.2018

तुम्हाला सर्वाधिक महत्वाचं वाटणारं नातं...... या बद्दल थोडेसे  :-

                                             

"तुम्हाला जर आयुष्यात अतिशय सुखी वाटत असेल तर त्याचं कारण तुमच्या आयुष्यात सर्व काही अगदी ठाकठीक चाललं आहे हे नसून, तुम्हाला खरोखरीच मौल्यवान वाटणारं कोणतंतरी नातं अतिशय आनंदात, सुरळीत चाललं आहे; हे असेल. जर तुम्हाला फार बैचैन, अस्वस्थ आणि दु:खी वाटतं असेल तर त्याचं कारण आयुष्यात सगळ चुकीच घडत आहे हे नसुन, तुम्हाला महत्वाच्या वाटणाऱ्या कोणत्यातरी नात्यात बिघाड झाला आहे; हे असेल.

नाती बियांप्रमाणे असतात. त्याचं पालनपोषण आणि संगोपन कराव लागतं. अपेक्षा तणाप्रमाणे असतात. त्या आपोआप वाढत जातात. जेव्हा एखाद्या नात्याच्या उभारणीत पुरेशी गुंतवणुक केलेली असते तेव्हा त्या अपेक्षा व्यवस्तीत भागत असतात. पण त्या नात्याकडे दुर्लक्ष झालं, तर अपेक्षा वादळाप्रमाणे त्या नात्यांची पाळंमुळं हादरवू लागतात. साकळून गेलेल्या नात्यांमध्ये अपेक्षा वाढत राहिल्या तर समस्या निर्माण होते.


यासाठी बँकेमधील खात्याचा दृस्टांत (उदाहरण) आपण पाहु. खात्यात आपण भरणा करत असतो म्हणुन आपल्याला रक्कम काढुन घेता येते. पण आपला संचय जेवढा झालेला असेल, तेवढीच काढणी करता येते. त्याचप्रमाणे नात्यामध्ये आपण ज्या प्रमाणात भरणा केला असेल तितक्याच प्रमाणात काढणी करता येते.

नात्यांमध्ये जर भरपूर भावनिक संचय झालेला असेल, तर चुका सहन केल्या जातात आणि त्यांना क्षमाही केली जाते. संप्रेषण जरी तोडकंमोडकं असलं तरी आशय समजुन घेतला जातो आणि तुमच्या कृतीत जरी काही कमी पडलं तरी तुमच्या उद्देशाची कदर केली जाते. एकंदरीत, नातं चांगल राहतं कारण तुम्ही चांगले आहात असा समज असतो आणि तुम्ही चांगले आहात असं समजलं जातं कारण त्या नात्यामध्ये भावनिक संचयाची पातळी पुरेशी राखण्यासाठी तुम्ही भरपुर भरणा केलेला असतो.

पण काही नाती गृहीत धरली जातात; ती अबाधित राहतील असा वृथा विश्वास बाळगला जातो आणि त्या नात्याचं नीट लालनपालन केलं जात नाही. अपेक्षा वाढत राहतात, पण नातं टिकवुन ठेवण्यासाठी आवश्यक ती  गुंतवणुक मात्र सातत्याने केली जात नाही. भावनिक संचयावरचा ताण वाढलेला असतो- काढणी जास्त झालेली असते. अशा परिस्थितीत तुम्ही उच्चारलेल्या प्रत्येक शब्दासाठी तुम्हला गुन्हेगार ठरवलं जातं. तुमच्या प्रत्येक चालीचा न्यायनिवाडा केला जातो. शाब्दिक चकमक आणि आदळाआपट या नित्याच्या गोष्टी बनुन जातात. तुमच्या कृतींची कदर केली जात नाही की तुमच्या हेतूचा आदर केला जात नाही. असं नात चालु ठेवणं सुरुंगाच्या खाणीतून चालण्यासारखं असतं केव्हाही स्फोट होऊ शकतो, अनेकदा स्फोट होऊ शकतो.

या समस्येच उत्तर सोपं आहे. भरणा, अधिक भरणा आणि अनेकदा अधिकाधिक भरणा, कोणतंही कार्यरत नातं काढणीपासुन मुक्त असु शकत नाही, पण आपण नेहमी पुरेसा भरणा करू शकतो.ज्या गोष्टींमध्ये म्हणजेच नात्यांमध्ये आपण आपल्या वेळेची गुंतवणुक करतो, ती वाढते. नात्याचं संगोपन दर्जेदार वेळेची गुंतवणुक करून करता येतें. ऐकण्यासाठी आणि समजुन घेण्यासाठी वेळ काढा. जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा संवाद साधुन सामंजस्य वाढवा. तुमच प्रेम, त्याचा अविष्कार आणि प्रात्यशिक करून दिसेलसं करा. देण्याची संधी साधा पण घेण्याची ही दानत दाखवा. देणाऱ्यांबद्दलचा आदर दाखवण्याचा एक मार्ग घेणं हा असतो आणि तो एक मोठा भरणाही असतो. एकेक भरणा करत राहुन मोठं नातं उभारा आणि आयुष्यात आनंदाची कमाई करा.

पुराणांमधून उदाहरणं दिसतात की देवदेवतांनाही नात्यांबाबताचे प्रश्न पडत होते. आपल्याला त्याची बरोबरी करण्यासाठी इथेच संधी मिळते.


                                                            "आपल्या मुलांसाठी 
                                                          आपणच कुराण आहोत
                                                   जे ते त्यांच्या आयुष्यात वाचतील; 
                                                             आपणच वेद आहोत 
                                                               जे ते पाहु शकतील;
                                            एकमेव बायबल ज्याचा त्यांना अनुभव घेता येईल,
                                            एकमेव धर्म ज्याचं अनुसरण ते करू शकतील.
         तुमच आणि माझं आयुष्य एक कर्तव्य आणि एक जबाबदारी पार पडण्याच्या हेतूने काम करील.
                                                                         किवां 
                                           ते तुमच्या आणि माज्या लेक्रांसमोर आदर्श उभा करील.
               मला माहित आहे ही जबादारी भीषण आहे. पण त्यांच्या आधी तुम्ही या ग्रहावर पाउल ठेवलंत 
                                                  तुम्ही, मी आपण सर्वानी जास्त पावसाळे पाहिलेत
                                    मग आपल्याला जे महत्वाचे वाटते ते नाते जपण्यासाठी आणि त्यास
                                            टिकवायचे कसे हे आपल्या पाल्याला शिकवण्यासाठी
                                            आणखी ह्याच दुसरं असं काय स्पष्टीकरण असु शकतं ?" 


  न पाठवलेलं पत्र या पुस्तकातुन (Marathi Translation of Unposted Letter)

लेखक महात्रया रा...                

Friday 23 February 2018

गोष्टी साध्या आणि सरळ विचार करावयास भाग पाडणाऱ्या .....

21st Update

गोष्टी साध्या आणि सरळ विचार करावयास भाग पाडणाऱ्या .....






१. धीरूभाई अंम्बानी यांचा ड्रायव्हर सोबतचा एका प्रवासातील प्रसंग गोष्टीच्या स्वरूपात :-

नक्की वाचा तुम्हाला आवडेल...

एकदा  धीरूभाई अंबानी एका अर्जंट मीटिंगसाठी त्यांच्या ड्रायव्हर सोबत जात होते, वाटेत सुसाट्याचा वारा आणि पाउस आला.

ड्रायव्हर ने अंम्बानीनां विचारले, 'सर आता काय करू...?'

त्याला  अंम्बानींनी उत्तर दिले :-  तू गाडी चालवत राहा.

पावसा मध्ये गाडी चालविणे मुश्कील होत होते.

परत ड्रायव्हर ने पुढे काही अंतर अंम्बानीनां विचारले, 'सर आता काय करू...?' त्याला  अंम्बानींनी पुन्हा म्हणाले  तू गाडी चालवत राहा.

थोडे पुढे गेल्यावर ड्रायव्हर ने पहिले की वाटेत पावसामुळे अनेक वाहने थांबली होती. यावर ड्रायव्हर अंम्बानीनां म्हणाला, सर मला आत्ता गाडी थांबवायला हवी' पुढचे दिसताना खुप अवघड जाते. सर्व लोक गाड्या बाजूला घेवून थांबलेत. काय करू सांगा सर...

त्याला  अंम्बानींनी पुन्हा सांगितले 'तू थांबु नको तुला हळू हळू जमेल तशी गाडी तू चालवत राहा.'
पावसाने रौद्र रूप धारण केले होते. परंतु ड्रायव्हर आत्ता एकाही प्रश्न साहेबांना न विचारता गाडी चालुच ठेवली आणि असेच हळू हळू गाडीने पुढे जायला लागल्यावर ड्रायव्हरला समोरचे साफ दिसायला लागले आणि पुढे काही अंतरावर गेल्यावर तर चक्क पाऊस गेला होता अक्षरशः पाउस नव्हताच आकाश मोकळे होते आणि ऊन पडले होते.

धीरूभाई अंम्बानी ड्रायव्हर ला तेथे जरा आणखी पुढे आल्यावर स्वतःहून म्हणाले, तू आत्ता गाडी थांबवु शकतोस.'

ड्रायव्हर म्हणाला आत्ता कशाला गाडी थांबवायची साहेब ..?

धीरूभाई म्हणाले थांबव तर खरे.

यावर ड्रायव्हर ने गाडी थांबवली, आणि ड्रायव्हर ने गाडी थांबवल्यावर ते स्वतः गाडीतुन खाली उतरले आणि ड्रायव्हर ला बाहेर बोलवुन मागे वळून पाहायला सांगितले, यावर ते ड्रायव्हर ला म्हणाले इथे तर चक्क ऊन पडले आहे, वाटेत थांबलेले लोक अजूनही तिथेच फसलेले आहेत आणि तू प्रयत्न न सोडता हळू हळू गाडी चालवत राहिलास आणि बघ आत्ता आपण त्या धोक्यातून पूर्ण पाने बाहेर पडलो. तू धीर खच्चून अजून तिथेच थांबला असतास तर अजून खुप वेळ आपल्याला तिथेच थांबावे लागले असते.

तात्पर्य :-



हा किस्सा त्यांच्या साठी आहे जे आत्ता वाईट परीस्तीथीतून जात आहेत. कठीण काळी खुप माणसे प्रयत्न सोडून हार मानतात. त्यामुळे अडचणीतून त्यांना लवकर बाहेर पडता येत नाही.




खरं तर प्रयत्नच आपल्याला संकटातून बाहेर काढतात. ते न करता आपण नशिबाला दोष देतो.  





जीवनातील एक सत्य :-



२. या संसारात दोन प्रकारचे वृक्ष आहेत ....


प्रथम :- आपल फळ स्वतःहून देणारे - उदाहरण :- आंबा, पेरू, केळी इत्यादी ...

द्वितीय :- आपलं फळ लपवुन ठेवणाऱ्या - उदाहरण :- बटाटा, आलं आणि कांदा इत्यादी ...

जे वृक्ष आपली फळ स्वतःहून देतात त्या वृक्षांना सर्वजण खत पाणी देऊन सुरक्षित ठेवतात.

परंतु

जे आपलं फळ लपवुन ठेवतात त्यांना मुळा सहित उपटुन टाकल जातं...



तात्पर्य :-



अगदी याच प्रमाणे जो मनुष्य आपली विद्या ज्ञान, धन, शक्ती  स्वतःहून समाजाच्या सेवेसाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी खर्च करतो. तो समाजात मान सन्मान मिळवण्यास प्राप्त ठरतो. त्याची चांगली कीर्ती समाजात शिल्लक राहते.



याउलट जो जो मनुष्य आपली विद्या ज्ञान, धन, शक्ती स्वार्थापोटी लपवुन ठेवतो. दुसऱ्यांना देण्याची वृती बाळगत नाही तो त्या वृक्षांप्रमाणे समाजात स्थिर राहत नाही. उपटला जातो.

तेव्हा या दोन गोष्टी लक्षात असूद्यात :-
१. प्रयत्न करने कधी सोडू नका, कासवाच्या गतीने का होईना पुढे चालत राहा.
२. आणखी एक  आपल्याजवळ जे काही इतरांना मदतीच्या स्वरूपात देण्यासारखे आहे ते देत राहा, कारण ज्ञान दिल्याने वाढते आणि मदत केल्याने आशीर्वाद मिळतात.