Sunday, 25 February 2018

तुम्हाला सर्वाधिक महत्वाचं वाटणारं नातं...... या बद्दल थोडेसे

22nd Update

Date :- 25.02.2018

तुम्हाला सर्वाधिक महत्वाचं वाटणारं नातं...... या बद्दल थोडेसे  :-

                                             

"तुम्हाला जर आयुष्यात अतिशय सुखी वाटत असेल तर त्याचं कारण तुमच्या आयुष्यात सर्व काही अगदी ठाकठीक चाललं आहे हे नसून, तुम्हाला खरोखरीच मौल्यवान वाटणारं कोणतंतरी नातं अतिशय आनंदात, सुरळीत चाललं आहे; हे असेल. जर तुम्हाला फार बैचैन, अस्वस्थ आणि दु:खी वाटतं असेल तर त्याचं कारण आयुष्यात सगळ चुकीच घडत आहे हे नसुन, तुम्हाला महत्वाच्या वाटणाऱ्या कोणत्यातरी नात्यात बिघाड झाला आहे; हे असेल.

नाती बियांप्रमाणे असतात. त्याचं पालनपोषण आणि संगोपन कराव लागतं. अपेक्षा तणाप्रमाणे असतात. त्या आपोआप वाढत जातात. जेव्हा एखाद्या नात्याच्या उभारणीत पुरेशी गुंतवणुक केलेली असते तेव्हा त्या अपेक्षा व्यवस्तीत भागत असतात. पण त्या नात्याकडे दुर्लक्ष झालं, तर अपेक्षा वादळाप्रमाणे त्या नात्यांची पाळंमुळं हादरवू लागतात. साकळून गेलेल्या नात्यांमध्ये अपेक्षा वाढत राहिल्या तर समस्या निर्माण होते.


यासाठी बँकेमधील खात्याचा दृस्टांत (उदाहरण) आपण पाहु. खात्यात आपण भरणा करत असतो म्हणुन आपल्याला रक्कम काढुन घेता येते. पण आपला संचय जेवढा झालेला असेल, तेवढीच काढणी करता येते. त्याचप्रमाणे नात्यामध्ये आपण ज्या प्रमाणात भरणा केला असेल तितक्याच प्रमाणात काढणी करता येते.

नात्यांमध्ये जर भरपूर भावनिक संचय झालेला असेल, तर चुका सहन केल्या जातात आणि त्यांना क्षमाही केली जाते. संप्रेषण जरी तोडकंमोडकं असलं तरी आशय समजुन घेतला जातो आणि तुमच्या कृतीत जरी काही कमी पडलं तरी तुमच्या उद्देशाची कदर केली जाते. एकंदरीत, नातं चांगल राहतं कारण तुम्ही चांगले आहात असा समज असतो आणि तुम्ही चांगले आहात असं समजलं जातं कारण त्या नात्यामध्ये भावनिक संचयाची पातळी पुरेशी राखण्यासाठी तुम्ही भरपुर भरणा केलेला असतो.

पण काही नाती गृहीत धरली जातात; ती अबाधित राहतील असा वृथा विश्वास बाळगला जातो आणि त्या नात्याचं नीट लालनपालन केलं जात नाही. अपेक्षा वाढत राहतात, पण नातं टिकवुन ठेवण्यासाठी आवश्यक ती  गुंतवणुक मात्र सातत्याने केली जात नाही. भावनिक संचयावरचा ताण वाढलेला असतो- काढणी जास्त झालेली असते. अशा परिस्थितीत तुम्ही उच्चारलेल्या प्रत्येक शब्दासाठी तुम्हला गुन्हेगार ठरवलं जातं. तुमच्या प्रत्येक चालीचा न्यायनिवाडा केला जातो. शाब्दिक चकमक आणि आदळाआपट या नित्याच्या गोष्टी बनुन जातात. तुमच्या कृतींची कदर केली जात नाही की तुमच्या हेतूचा आदर केला जात नाही. असं नात चालु ठेवणं सुरुंगाच्या खाणीतून चालण्यासारखं असतं केव्हाही स्फोट होऊ शकतो, अनेकदा स्फोट होऊ शकतो.

या समस्येच उत्तर सोपं आहे. भरणा, अधिक भरणा आणि अनेकदा अधिकाधिक भरणा, कोणतंही कार्यरत नातं काढणीपासुन मुक्त असु शकत नाही, पण आपण नेहमी पुरेसा भरणा करू शकतो.ज्या गोष्टींमध्ये म्हणजेच नात्यांमध्ये आपण आपल्या वेळेची गुंतवणुक करतो, ती वाढते. नात्याचं संगोपन दर्जेदार वेळेची गुंतवणुक करून करता येतें. ऐकण्यासाठी आणि समजुन घेण्यासाठी वेळ काढा. जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा संवाद साधुन सामंजस्य वाढवा. तुमच प्रेम, त्याचा अविष्कार आणि प्रात्यशिक करून दिसेलसं करा. देण्याची संधी साधा पण घेण्याची ही दानत दाखवा. देणाऱ्यांबद्दलचा आदर दाखवण्याचा एक मार्ग घेणं हा असतो आणि तो एक मोठा भरणाही असतो. एकेक भरणा करत राहुन मोठं नातं उभारा आणि आयुष्यात आनंदाची कमाई करा.

पुराणांमधून उदाहरणं दिसतात की देवदेवतांनाही नात्यांबाबताचे प्रश्न पडत होते. आपल्याला त्याची बरोबरी करण्यासाठी इथेच संधी मिळते.


                                                            "आपल्या मुलांसाठी 
                                                          आपणच कुराण आहोत
                                                   जे ते त्यांच्या आयुष्यात वाचतील; 
                                                             आपणच वेद आहोत 
                                                               जे ते पाहु शकतील;
                                            एकमेव बायबल ज्याचा त्यांना अनुभव घेता येईल,
                                            एकमेव धर्म ज्याचं अनुसरण ते करू शकतील.
         तुमच आणि माझं आयुष्य एक कर्तव्य आणि एक जबाबदारी पार पडण्याच्या हेतूने काम करील.
                                                                         किवां 
                                           ते तुमच्या आणि माज्या लेक्रांसमोर आदर्श उभा करील.
               मला माहित आहे ही जबादारी भीषण आहे. पण त्यांच्या आधी तुम्ही या ग्रहावर पाउल ठेवलंत 
                                                  तुम्ही, मी आपण सर्वानी जास्त पावसाळे पाहिलेत
                                    मग आपल्याला जे महत्वाचे वाटते ते नाते जपण्यासाठी आणि त्यास
                                            टिकवायचे कसे हे आपल्या पाल्याला शिकवण्यासाठी
                                            आणखी ह्याच दुसरं असं काय स्पष्टीकरण असु शकतं ?" 


  न पाठवलेलं पत्र या पुस्तकातुन (Marathi Translation of Unposted Letter)

लेखक महात्रया रा...                

No comments:

Post a Comment