दिनांक :- ०२-१२-२०१८
अप्रतिम लेख नक्की वाचा आणि वाचल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही बदल करावासा वाटला तर नक्कीच करा..
मी तर म्हणतो बघा वाचून एकदा हा लेख नक्कीच फरक पडेल तुमच्या आयुष्यात कदाचित हा लेख तुमच्या ही वाचनात याआधी आला असेलही तरीपण पुन्हा एकदा माज्या वाचनात आलेला हा लेख तुम्हा सर्वांसाठी :-
!!! BE THE CEO OF YOUR OWN LIFE !!!
दोन दिवसापुर्वीची गोष्ट कुटुंबासह कुठल्यातरी मॉल मध्ये होतो. मुलगा 'प्ले झोन' मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसीची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो. पेपर खर तर नावाला. माणसं वाचत बसलो होतो. विविध चेहऱ्यांची, आकारांची माणसं जणू 'आज' जगाचा शेवटचा दिवस असावा' असे भाव आणुन शॉपिंग करत होती. (एवढ्या वस्तु विकत घेऊन त्या वस्तु माणसं घरात कुठे ठेवतात, हा मध्यम वर्गीय प्रश्न मला कायम सतावतो. असो.)
माझं 'माणसं-वाचन' चालु असतानाच माज्या शेजारी एक तरुण येऊन बसला. जेमतेम चाळीसीचा असावा. जीन्स आणि खोचलेला टी-शर्ट, पायात बुट, अंगावर बुट, हातात मराठी पुस्तक, खिशातला शुभ्र रुमाल काढुन त्याने कपाळावरचा घाम पुसला. रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि त्याचं खिशात ठेवली. त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले. ते पुस्तक माज्या आवडत्यांपैकी एक होतं. न राहवून मी म्हंटल, मस्त पुस्तक आहे.' त्याने माज्याकडे बघुन हसत मान हलवली.
पाच एक मिनिटांनी तो माज्याकडे वळुन म्हणाला, 'वाचन आवडतं..?'
'प्रचंड. रीडिंग इज माय फर्स्ट लव्ह,' आजूबाजूला 'सौ' नाही हे बघत मी म्हटलं.
'किती वाजता रोज...?'
'रोज असं नाही... अं...काही खास असं ठरवलेलं नाही. इच्छा झाली कि वाचतो.' अनपेक्षित योर्करला कसं बसं खेळत मी म्हटल.
खायला आवडतं? कॉनजीक्यूटिव्ह यॉर्कर.
प्रचंड इटिंग इज माय सेकंड लव्ह.'
हो.' मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा...??
'नाही नाही... रोज दोन वेळा.. आणि मध्ये मध्ये काही ना काही खादाडी चालु असतेच.' हिट विकेट !
तो तरुण हसला आणि म्हणाला मी दिवस भरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. अंघोळ जेवण तसच वाचन...!!
'बरा वेळ मिळतो तुम्हाला.' दयनीय चेहरा करत मी म्हटलं.
त्यावर तो तरुण म्हणाला:
वेळ मिळत नाही, मी काढतो. तसाही 'वेळ' ही जगातली सगळ्यात टेकन फॉर ग्रांटेड गोष्ट आहे असं मी मानतो. फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना ! फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला ! 'मी' रिटायर झाल्यावर भरपुर वाचन करणारे' असं कोणी म्हंटल ना, की माझी खात्री आहे की, नवज्योत सिंग सिद्धुसारखा रेड्यावर हात आपटत तो 'यम हसत असेल' !
मी हसलो तसं किंचित गंभीर होत त्याने विचारल, 'तुम्ही कधी पाहिलंय यमाला..?'
मी आणखी हसु लागलो.
'आय एम प्रीटी सिरीयस. तुम्ही पाहिलंय यमाला..?
मी म्हणालो हो, दोन वर्षापुर्वी. रस्ता क्रॉस करत होतो. समोरून भरगाव गाडी आली, त्या दिव्यांच्या प्रकाश झोतातही मी अंधार पहिला. त्या दोन सेकंदात मला मृत्यूने दर्शन दिलं. त्या नंतर जागा झालो ते हॉस्पिटल मध्येच. गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो. हॉस्पिटल मधुन घरी आलो ते नवा जन्म घेऊन. 'मी' देव पहिला नव्हता पण 'मृत्यू' पहिला होता. मृत्यू तुम्हाला खुप शिकवतो.
माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनही 'मी' अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणुस ! तुम्हाला माहितीय, माणुस मृत्यूला का घाबरतो..?
'अर्थात' ! मृत्युनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात. मृत्युमुळे माणसाच्या इच्छा अपुर्ण राहतात.'
मी म्हटलं. साफ चूक, माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्युनंतर 'उद्या' नसतो !'
'मी समजलो नाही.'
'प्रत्येक काम आपल्याला उद्यावर टाकायची सवय असते. वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे.. गंमत म्हणजे आहेत ते पैसे सुद्धा आपण आज उपभोगत नाही. ते कुठेतरी गुंतवतो. भविष्यात 'डबल' होऊन येतील म्हणुन !
या उद्या वर आपला फारसा भरवसा नसतो. पण तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो. आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू आपल्याला उद्या बघायची संधी देत नाही. !मृत्यू म्हणजे- आहोत तिथे, आहोत त्या क्षणी फुल स्टॉप ! म्हणजे खेळ ऐन रंगात आलेला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढाव, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो. तुमच्यावरील या 'अन्यायाविरुद्ध' आवाज उठवायला सुद्धा तुम्ही उरत नाही. माज्या मृत्यू नंतर मी माजा 'लाडका' उद्या पाहु शकणार नाही, या हतबलतेला मनुष्य जास्त घाबरतो. म्हणुन मी हॉस्पिटल मधुन घरी आल्यावर ठरवलं. या पुढंच आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं. इतके दिवस जेवण नुसतेच 'गिळल'. यापुढे एकेका घासाची मजा घ्यायची. आयुष्याची माजा घेत जगायचं.'
'म्हणजे तुम्ही नक्की काय केलं ..? माझी उस्तुकता आता वाढली होती.
'माज्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली. मी माज्या आयुष्याचा CHIEF EXECUTIVE OFFICER झालो !'
कंपनीचा सी. ई. ओ. वैगरे इतपर्यंत ठीक आहे. आयुष्याचा 'सी. ई. ओ. वैगरे.. जरा जास्तच होत नाही का..? मी विचारलं.
'वेल... तुम्हाला काय वाटतं हे माज्यासाठी महत्वाच नाही. आयुष्य कसं जगायचं याचे नियम मी माज्यापुरते केलेत. त्यामुळे..'
'मग तुमच्या कंपनीत किती माणसं आहेत..? त्याला मध्येच तोडत, मस्करीच्या सुरात मी विचारलं, म्हटलं तर खुप, म्हंटल तर कोणीच नाही.' तो खांदे उडवत म्हणाला.
मला न कळल्याच पाहुन तो पुढे बोलु लागला. 'मी फक्त माज्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सोबत दिल करतो. दे व्हर्चुअली कंट्रोल माय लाईफ.
माज्या बोर्डवर विविध माणसे आहेत. फरहान अख्तर, शिवाजी महाराज, अब्दुल कलाम, चार्ली चॅप्लीन, गांधीजी, अमिताभ, हेलन केलर, जे आर डी टाटा....'
माज्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भान न्याहाळत त्याने आणखी काही नावे घेतली.
‘या लोकांबद्दल
वाचलं तेव्हा एक लक्षात आलं. या प्रत्येकामध्ये काहीना काही वैशिष्ट्य आहे. काही
क्वालिटीजमुळे मला ही माणसं ग्रेट वाटतात. मी काय करतो…अं…उदाहरण देतो…समजा खोटं
बोलण्यावाचून पर्याय नाही अशा परिस्थितीत सापडलो की माझे ‘एथिक्स डायरेक्टर’
गांधीजींना विचारतो, काय करू? मग ते सांगतील ते करतो. व्यायाम करायला
जाताना सकाळी उठायचा कंटाळा आला तर माझे ‘हेल्थ डायरेक्टर’ फरहान अख्तर मला काय
म्हणतील, या विचाराने मी
उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो. कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं. मग
माझ्या ‘इन्स्पीरेशन डायरेक्टर’ हेलन केलरना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या
अडचणी फारच मामुली वाटू लागतात. कधी दुःखी झालो तर ‘इंटरटेनमेंट डायरेक्टर’ चार्ली
चॅप्लीन भेटायला येतात…’
माझ्या चेहऱ्यावरील
विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला..’मला माहितीय की ऐकायला हे सगळं विचित्र वाटत
असेल. पण एक गोष्ट सांगतो. आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल, तर प्रत्येक माणसाने स्वतःचा ‘सीलॅबस’
बनवावा हे उत्तम ! आपण अनेकदा ‘इतरांप्रमाणे’ आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि
तिथेच फसतो. जगायचं कसं? या प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहेत.
हजारो वर्षे माणूस
या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. गौतम बुद्धांनी मात्र फक्त चार शब्दांत उत्तर दिलं -Be your own light. मला तर वाटतं, याहून सोपं आणि याहून कठीण स्टेटमेंट
जगात दुसरं नसेल !’
मी त्या तरुणाला नाव
विचारलं. त्याने सांगितलं. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
चार पावलं चालून
गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला. म्हणाला, ‘सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं.
मी एका
अॅक्सिडेंटमध्ये वाचलो आणि इतकं काही शिकलो. तुम्ही…प्लीज..कुठल्या अॅक्सिडेंटची
वाट पाहू नका !’ आम्ही दोघेही हसलो.
अपघात फक्त वाहनांमुळेच
होतात, असं थोडीच आहे? ओळखपाळख नसलेला तो तरुणही अपघातानेच
भेटला की !
घरी जायला आम्ही
रिक्षात बसलो. ‘प्ले झोन’मध्ये खेळून पोरगं आधीच दमलं होतं. वाऱ्याची झुळूक
रिक्षात येऊ लागली. मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपून गेला होता. त्याच्या मऊ मऊ
केसांमधून हात फिरवताना संध्याकाळच्या गप्पा आठवत होत्या.
मनात आलं, ‘आपल्या पोराने जर असे ‘बोर्ड ऑफ
डायरेक्टर्स’ नेमले, तर त्यात ‘त्याचा
बाप’ असेल का?’
परवाच्या रात्री
बराच वेळ जागा राहिलो.
कोण जाणे, कदाचित हाच प्रश्न यापुढील आयुष्य
‘चवीने’ जगत राहायची उर्जा देत राहील !
प्रत्येकाने वाचावा
असा नविन काळेंचा अप्रतिम लेख.